अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय Atrocity Act in Marathi

Atrocity Act in Marathi – Atrocity Meaning in Marathi अ‍ॅट्रॉसिटी कायदा माहिती आज आपण या लेखामध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायदा (atrocity act) या विषयावर माहिती घेणार आहोत म्हणजेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा काय आहे त्याचा उपयोग कशासाठी केला जातो आणि तो वापरल्यामुळे कोणते फायदे होतात अश्या या कायद्याबद्दल सर्व माहिती माहिती घेवूयात. आपण ज्यावेळी या कायद्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये येणारा पहिला प्रश्न म्हणजे अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय आणि तर अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे हा कायदा दारिद्र्य रेषे खालील आणि आदिवासी गटातील लोकांच्यासाठी ह्या कायद्याची सुरुवात करण्यात आली.

आपल्या देशामध्ये अनेक गोष्टींना बंधन घालण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी, नियमांच्या चौकटीमध्ये घालण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी लोकांच्यासाठी अनेक कायदे बनवलेले असतात आणि त्यामधील हा कायदा देखील आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा (atrocity act) हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी बनवण्यात आलेला एक महत्वाचा कायदा आहे आणि हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लागू होतो. या कायद्यामध्ये असे आहे कि हा कायदा मुख्य अनुसूचित जाती जमातींच्यावर कोणीही अन्याय करू शकत नाही.

म्हणजे या कायद्याच्या कलामांच्यानुसार त्यांना मारहाण करणे किंवा इजा करणे तसेच त्यांचा सतत अपमान करणे, तसेच त्यांना अयोग्य पदार्थ खाण्यासाठी जबरदस्ती करणे, नग्न करून धिंड काढणे, महिलांचा लैंगिक छळ करणे, अनुसूचित जाती जमातीतील लोकांना त्रास देणे किंवा त्यांच्यावर सतत अन्याय करणे, भीती दाखवून मतदान करण्यासाठी भाग पडणे अश्या सर्व गोष्टींच्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा ( atrocity act ) हा लागू होतो.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा ( atrocity act ) हा भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून आहे म्हणजेच हा खूप जुना कायदा आहे. सध्या जरी अनेक वेगवेगळ्या प्रकाचे कायदे जन्माला आले असले तरी हा कायदा खूप जुना कायदा आहे जो भारताच्या संसदेने इ. स १९८९ मध्ये सुरु झाला आणि हा अनुसूचित जाती आणि जमातींच्यासाठी एक संरक्षण कायदा होता. चला तर या कायद्याबद्दल आपण आणखीन जाणून घेवूयात.